माझ्या पिढीत अनेक सुशिक्षित महिला आहेत, पण त्यांनी वैयक्तिक कारकिर्दीपेक्षा घराची जबाबदारी महत्त्वाची मानली, कदाचित अशा महिलांचं प्रतिनिधित्व करणारी माझी कथा आहे

मला हे सांगितलंच पाहिजे की, मी पूर्णवेळ शास्त्रज्ञ जरी बनू शकले नाही, तरी मला घरच्या काम करताना, मुलांचं संगोपन करताना, त्यांचे कपडे शिवताना, प्रवास करताना आणि त्यांचं संगोपन करून त्यांना मोठं करताना समाधान मिळालं. मला मुलांना गणित शिकवायला आवडतं. शाळेतील मुलांना अवघड गणित विषय समजण्यात मदत करणं, समाधानाचं आहे. म्हणून मी ज्यांना गणिताची भीती वाटते, अशा मुलांसाठी गणित अधिक रंजक करून सांगणारं एक पुस्तक लिहिलं.......